भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरला करोनाची लागण; केले हे आवाहन

https://maharashtratimes.com
 
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरला करोनाची लागण; केले हे आवाहन
Jan 25th 2022, 07:41

नवी दिल्ली: भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर आणि सध्या भारतीय जनता पक्षाचा खासदार याला करोनाची लागण झाली आहे. गंभीरने सोशल मीडियावर या संदर्भात एक पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी करोना चाचणी करून घ्यावी आणि सुरक्षित रहावे असे आवाहन त्याने केले आहे. वाचा- पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गंभीरने ट्वीट करून करोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती दिली. काही सौम्य लक्षण जाणवल्यावर मी करोनाची चाचणी करून घेतली. ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:ची टेस्ट करून घ्यावी आणि सुरक्षित रहावे. वाचा- वाचा- आयपीएलमध्ये गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाने दोन वेळा विजेतेपद मिळवले होते. आता आयपीएलच्या १५व्या हंगामात गंभीर नव्या भूमिकेत दिसणार आहे. आयपीएलमध्ये नव्याने समावेश झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने त्याला मेटॉर केले आहे. या संघाचे नेतृत्व केएल राहुल करणार असून स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वात महाग संघ आहे. वाचा- भारताकडून खेळताना गंभीरने ५८ कसोटीत ४२च्या सरासरीने ४ हजार १५४, १४७ वनडेत ५ हजार २३८, तर ३७ टी-२० सामन्यात ९३२ धावा केल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावावर ९ शतक तर २२ शतक आहेत, वनडेत त्याने ११ शतक केली आहेत. आयपीएलमध्ये दोन विजेतेपदासह त्याने १५४ सामन्यात ३१च्या सरासरीने ४ हजार २१७ धावा केल्या आहेत.

You are receiving this email because you subscribed to this feed at blogtrottr.com.

If you no longer wish to receive these emails, you can unsubscribe from this feed, or manage all your subscriptions.
Previous Post Next Post

Contact Form