कोच द्रविड यांनी भूमिका बदलली; म्हणाले, ...तरच संघात स्थान मिळेल

https://maharashtratimes.com
 
कोच द्रविड यांनी भूमिका बदलली; म्हणाले, ...तरच संघात स्थान मिळेल
Jan 25th 2022, 05:19

केपटाउन: भारतीय वन-डे क्रिकेट संघात समतोलपणा अभाव असून, सहाव्या-सातव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांसारख्या अष्टपैलूची उणीव जाणवली, असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक यांनी व्यक्त केले. वाचा- भारतीय संघाने कसोटी मालिका १-२ अशी गमावली. त्यापाठोपाठ वन-डे मालिकेतही भारतीय संघाला ०-३ असा सपाटून मार खावा लागला. यानंतर द्रविड यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती होणे स्वाभाविकच होते. मधल्या षटकांत फलंदाजी आणि गोलंदाजीतील खराब कामगिरी झाली. द्रविड म्हणाले, की संघाची लय ही समतोलपणावर अवलंबून असते. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर जे खेळाडू सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकावर अष्टपैलू म्हणून एक उत्तम पर्याय असतात, असे खेळाडू निवडीसाठी या वेळी उपलब्ध नव्हते. हार्दिक पंड्या फिटनेसमुळे, तर जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. द्रविड म्हणाले, की आशा आहे, ते (हार्दिक आणि जडेजा) परततील, तेव्हा संघाला अधिक सखोलता येईल. यामुळे आम्हाला वेगळ्या पद्धतीने खेळताही येईल. वाचा- ; पाहा काय म्हणाला... 'राहुल अनुभवातून शिकेल' कर्णधारपदाची धुरा हाती घेतलेल्या लोकेश राहुलबाबत द्रविड म्हणाले, की उपलब्ध संघातून जे सर्वोत्तम करता येईल, ते त्याने केले, हे लोकांनी समजून घ्यायला हवे. मला वाटते, की त्याने चांगले काम केले. पराभवानंतर हे सोपे नसते. मात्र, त्याने ही सुरुवातच केली आहे. तो जशी वेळ जाईल, तसे तो अनुभवातून शिकेलही. कर्णधार म्हणजे आपल्या सहकाऱ्यांकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणे, हेही महत्त्वाचे असते. वन-डे संघात काही उणीवा राहिल्या. मात्र, त्याने त्याचे काम चांगले केले. जसजसा अनुभव मिळेल, तसा तो एक उत्तम कर्णधार होईल. वाचा- भारतीय फलंदाजी वीस ते चाळीसाव्या षटकादरम्यान भरकटली. द्रविड म्हणाले, की आम्ही मधल्या षटकांत अधिक चांगली फलंदाजी करू शकलो असतो. मात्र, दोन सामन्यांत प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने जवळजवळ २९० धावा केल्या. त्या दोन्ही सामन्यांत तीस षटकांनंतर आम्ही जिंकण्याच्या स्थितीत होतो. आम्ही काही खराब फटके मारले. महत्त्वाच्या क्षणी आम्ही चातुर्याने खेळ करू शकलो नाही. खेळाडूंची नावे घेऊन काही म्हणणाऱ्यांतील द्रविड नाहीत. मात्र, मधल्या फळीतील काही फलंदाजांना अनेक संधी दिल्यानंतरही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. याबाबतीत त्यांचा रोख श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्यावर होता. द्रविड म्हणाले, की आम्ही त्यांना सातत्याने संधी दिली. संघातील स्थानाबाबत त्यांना सुरक्षित वाटावे, असे आम्हाला वाटते. मात्र, सुरक्षा आणि संधी दिल्यानंतर तुम्ही कामगिरीचीही अपेक्षा करता. गरजेच्या वेळी त्यांनी चांगली कामगिरी करावी, हीच अपेक्षा या स्तरावर खेळताना त्यांच्याकडून असते. आम्हाला शक्यतेवढे स्थैर्य ठेवायचे आहे. वाचा- 'प्रत्येक स्थानासाठी स्पर्धा' द्रविड म्हणाले, की तुम्ही जेव्हा चौथ्या, पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करता, तेव्हा तुम्हाला संघासाठी काय गरजेचे आहे, याची जाण असायला हवी. श्रेयस तिन्ही सामन्यांत लवकर बाद झाला. आम्हाला माहीत आहे, हे खेळाडू चांगली कामगिरी करत आले आहेत आणि त्यांना आम्ही शक्यतेवढी साथही देऊ. मात्र, संघात प्रत्येक स्थानासाठी खूप स्पर्धा आहे आणि अशा परिस्थितीत हे सोपे नसते. अनेक पर्याय उपलब्ध भारतीय संघातून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळायचे असेल, तर वेंकटेश अय्यरला मधल्या फळीच्या दृष्टीने स्वतःला सज्ज व्हायला लागणार आहे. आयपीएलमध्ये कोलकाताकडून खेळताना चमकदार कामगिरी केलेल्या वेंकटेश अय्यरबाबत द्रविड म्हणाले, की सहावा गोलंदाज म्हणून वेंकटेशसारख्या खेळाडूंना तयार करायचे आहे. वेंकटेश असो वा हार्दिंक किंवा जडेजा, जेव्हा हे परततील, तेव्हा आमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध असतील.

You are receiving this email because you subscribed to this feed at blogtrottr.com.

If you no longer wish to receive these emails, you can unsubscribe from this feed, or manage all your subscriptions.
Previous Post Next Post

Contact Form